नवीन जाहिरात,पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता १२वी पास; अर्ज सुरु!
PMC Bharti 2025
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही खूप चांगली संधी आहे! पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागात नोकरी (PMC Bharti 2025) करण्यासाठी अर्ज करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. १२वी, डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची जाहिरात समाज विकास विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. डिजिटल फोटोग्राफी इन्स्ट्रक्टर, वायरिंग, मोटर रिवाइंडिंग, फ्रीज-एसी दुरुस्ती प्रशिक्षण, मोबाईल रिपेअर इन्स्ट्रक्टर, आणि भरतकाम प्रशिक्षक अशा पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत अर्ज लवकरात लवकर सादर करावा. पुणे महानगरपालिका आणि समाज विकास विभाग यांच्याद्वारे या भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
तसेच मित्रांनो, या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. याचसोबत उमेदवाराला १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. त्याचसोबत टायपिंग प्रशिक्षण, इंग्रजी भाषा ट्रान्सलेशन प्रशिक्षक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेअंतर्गत समाज विकास विभागात २९ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती सहा महिन्यांकरिता करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज त्याचसोबत पासपोर्ट साइज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता दाखला आणि इतर कागदपत्रे हे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पाठवायचा आहे. २ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/1OA3k |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://pmc.gov.in |