येत्या आठवडाभरात ६८६ लाभार्थ्यांच्या खात्यांत अर्थसाहाय जमा होणार |
Nashik Mahanagarpalika Divyang Arth Sahay: नाशिक महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग, तसेच गतिमंदांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. दिव्यांग व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा, याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना अर्थसाह्य पुरविले जाते. तीन योजनांतर्गत ६३८ लाभाच्यांना तीन महिन्यांचे अर्थसात्ा, तसेच ४८ लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे.
शहरातील रहिवासी असलेल्या दिव्यांग, तसेच दिव्यांग पालकांसाठी मनपाच्या समाज कल्याण विभागामार्फत जवळपास १६ योजना राबविल्या जातात. मनपाच्या अंदाजपत्रकात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच उपक्रमांसाठी एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के रकमेची तरतूद केली जाते. या तरतुदीद्वारे दिव्यांग लाभाथ्यांना अर्थसाह्य केले जाते. त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या बँक खात्यांवर अर्थसाहाय जमा केले जाते.
लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वच शासकीय कारभार ठप्प होता. त्याचा फटका समाज कल्याण विभागाच्या योजनांनाही बसला. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर छाननी समितीने प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांच्या संगतीने अर्थसाहा जमा करण्याकरिता अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर केला असून, येत्या आठवडाभरात संबंधित एकूण ६८६ लाभार्थ्यांच्या खात्यांत अर्थसाहा जमा होणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांनी सांगितले. योजना क्रमांक ३ अंतर्गत दिव्यांग प्रौढ बेरोजगार युवकांना दरमहा तीन हजार, तर योजना क्रमांक ९ अंतर्गत दिव्यांगांमधील गतिमंद व मतिमंदांच्या उदरनिर्वाहाकरिता दरमहा तीन हजार रुपये अर्थसाह्य अदा केले जाते. या दोन्ही योजनांच्या ६३८ लाभार्थ्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे अर्थसाहा देण्यात आले आहे.
अशी दिली जाते शिष्यवृत्ती..
योजना क्रमांक ५ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना २० ते ४० हजारापर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती अदा केली जाते. यंदा ४८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. नाशिक मनपाच्या व खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्याथ्यर्थ्यांना ही योजना लागू आहे. बाल वर्ग ते इयत्ता १२ वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना २० हजार रुपये, दिव्यांग मुले व व्यक्तींना शिक्षण व त्यासीबत थेरपी सुरू असल्यास २४ हजार रुपये, पदवी व समकक्ष शिक्षण घेणाऱ्या, तसेच आयटीआय, डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांगांना २६ हजार, पदव्युत्तर पदवी व समकक्ष शिक्षण घेणाऱ्यांना ४० हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.