आवास योजनेंतर्गत राज्याला आज मिळणार १३ लाख घरांची भेट
PMAY Home Issue Details 2025
राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना उद्या (ता. २३) पंतप्रधान आवास योजनेच्या १३.६० लाख घरांची भेट मिळणार आहे. पुणे येथे राष्ट्रीय किसान दिनाच्या कार्यक्रमामध्ये कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान राज्यात ग्रामविकास मंत्रालयातर्फे १३.६० लाख घरे बांधण्याची घोषणा करतील. PMAY Home Issue Details 2025
पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही 25 जून 2015 रोजी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे, ज्याचा उद्देश 2022 पर्यंत प्रत्येकाला परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे. ही योजना दोन विभागांत राबवली जाते: ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) आणि शहरी भागासाठी पंतप्रधान आवास योजना-शहरी (PMAY-U). आर्थिक दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी (MIG) गृहकर्जावर व्याज सवलत दिली जाते. ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी ₹1.20 लाख (सामान्य क्षेत्रात) आणि ₹1.30 लाख (डोंगराळ भागात) अनुदान दिले जाते, तर शहरी भागात घरे बांधण्यासाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना (CLSS) अंतर्गत 6.5% पर्यंत व्याज सवलत दिली जाते. अनुसूचित जाती-जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक गटांना प्राधान्य देऊन ही योजना राबवली जाते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ घरे बांधणे योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पुण्यात उद्या (ता.२३) सकाळी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये कृषी मंत्रालयाच्या कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. त्यानंतर राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील संवाद साधतील. त्यानंतर दुपारी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अटारी येथे केंद्रात किसान दिनाच्या कार्यक्रमामध्ये चौहान सहभागी होतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, खासदार आणि आमदारही उपस्थित असतील. याच कार्यक्रमामध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या पंतप्रधान आवास योजनेतील १३.६० लाख घरे बांधण्याची घोषणा कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान करतील.