मातोश्री वस्तीगृहातील एकूण १० रिक्त जागांकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत | Nashik Matoshri Hostel Application Form
Nashik Matoshri Hostel Application Form
Nashik Matoshri Hostel Application Form: शासन निर्णय क्रमांक वसति ५३१७/प्र. क्र.९/मशि-२ दिनांक १८ ऑक्टोंबर, २०२२ अन्वय मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक, येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था साथीर, पुणे यामार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा लक्ष्यात गटातील ७५ मुलींसाठी व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर यामार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या गटातील ७५ मुलींसाठी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५० मुलींसाठी अशा प्रकारे लक्षित घटकातील एकूण २०० मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे. त्यानुसार मातोश्री वस्तीगृहातील एकूण १० रिक्त जागांकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाज्योती संस्था निकष, अटी व शर्ती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच इच्छुक मुलींनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर Notic Board येथे जाऊन “Application For Nashik Matoshri Hostel ” यावर Onilne अर्ज करावा तसेच त्याची प्रिंट काढून खालील पत्त्यावर आवश्यक कागदपत्रे जोडून प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टाने जमा करावा. महाज्योती विभागीय कार्यालय पत्ता- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, नाशिक पुणे रोड नाशिक – ४२२०११ संपर्क ८०८७५७६३९३, ई मेल- [email protected], संकेतस्थळ :- www.mahajyoti.org.in