महत्वाचे, लिपिक पदांची १३,७३५ पदांची मोठी भरती जाहिराती आली, अर्ज सुरु – sbi clerkbharti 2025
sbi clerkbharti 2025
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लर्क – ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) या पदासाठी मोठ्या प्रमाणावर १३,७३५ रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 17 डिसेंबरपासून सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे. बँकेने देशभरात एकूण 13735 जागा जाहीर केल्या आहेत. या बद्दलची पूर्ण माहिती बघू या!
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी हे सुनिश्चित करावे की त्यांनी IDD 31 डिसेंबर 2024 किंवा त्यापूर्वी पूर्ण केले आहे.
तसेच, जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात आहेत, ते देखील या अटीच्या अधीन तात्पुरते अर्ज करू शकतात की, तात्पुरते निवड झाल्यास, त्यांना 31 डिसेंबर 2024 किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. अर्ज करण्यासाठी सामान्य, इतर मागासवर्ग (OBC), आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. इतर सर्व उमेदवारांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
या भरती साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि ज्यांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे केली जाईल. अधिसूचना, रिक्त जागा, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील खालील लेखात पाहता येतील.
SBI ज्युनियर असोसिएट भरतीसाठी अर्ज यशस्वीपणे सादर करणाऱ्या उमेदवारांना फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी बोलावले जाईल. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी मार्च/एप्रिल 2025 मध्ये बोलावले जातील. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पण बँकेत रुजू होण्यापूर्वी, निवडलेल्या स्थानिक भाषांचे ज्ञान तपासण्यासाठी चाचणी घेतली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदावर नेमणुकीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तपशीलवार अधिसूचना खालील तक्त्यात दिलेली आहे.
खुशखबर! 13,735 लिपिक पदांची भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा! -SBI Clerk Bharti 2024