सरळ सरकारी नोकरी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित!
ACB Maharashtra Bharti
आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हि आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्याच्या अधीन असलेल्या रिक्त पदांसाठी नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मित्रानो, सरकारी नोकरी मिळवण्याची ही खरच एक उत्तम संधी आहे. हि नवीन जाहिरात ACB Maharashtra Bharti अपर पोलीस अधीक्षक (मुख्यालय – २), महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध ८ पदे भरती जाणार आहे. चला तर मग बघूया पूर्ण माहिती.
तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau – ACB) हा एक महत्त्वाचा सरकारी विभाग आहे, जो भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यात या विभागाची स्थापना लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभाग नोकरी मिळणे म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा आहे. याच विभागात आता सरळ नोकरीची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात विधि अधिकारी गट-ब या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण 08 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. नियुक्तीचे ठिकाण मुंबई येथे असेल. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज जाहिरातीत नमूद केलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती व मूळ जाहिरात पाहण्यासाठी विभागाची अधिकृत वेबसाईट acbmaharashtra.gov.in येथे भेट द्या किंवा खालील लिंक वरून आपण पूर्ण माहिती जाहिरात बघू शकता.