मोठी बातमी! जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता फक्त १२वी पास, अर्ज सुरु!

PM Poshan ZP Bharti 2024

जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती सुरु आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. डेटा एन्ट्री पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत चांगली नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (PM Poshan ZP Bharti 2024) 

PM Poshan Bharti 2024

या नोकरीसाठी १२ वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी टायपिंग यायला हवे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना २५००० रुपये पगार देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना (PM POSHAN योजना) ही भारत सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. पूर्वी याला मध्याह्न भोजन योजना म्हणत होते. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार उपलब्ध करून देणे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळेल. या योजने अंतर्गत संगणक चालक पदांची हि भरती प्रक्रिया होत आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • १) १० वी व १२ वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • २) शाळा सोडल्याचा दाखला.
  • ३) अनुभव प्रमाणपत्र.
  • ४) पासपोर्ट साईज फोटो- २ कॉपी
  • ५) संगणक- एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपत्र.
  • ६) टायपिंग मराठी- ३० wpm प्रमाणपत्र.
  • ७) टायपिंग इंग्रजी- ४० wpm प्रमाणपत्र.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १२ डिसेंबर २०२४ पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा १० जानेवारी २०२५ रोजी होऊ शकतात. याबाबत अधिक माहिती आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे.

अर्जाची आणि जाहिरातीची लिंक 

1 Comment
  1. Anuja says

    Which location?

Leave A Reply

Your email address will not be published.