पोलीस दलात ३३ हजार पदे रिक्त, नवीन पदभरती आता..!
Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. (Maharashtra Police Bharti 2025) त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत. तसेच आता नवीन पद्भारतीची अपेक्षा उमेदवारांना आहे. लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती सुरु होईल असे संकेत सुद्धा सध्या दिसत आहे. या मेले उमेदवारांसमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे मंजूर संख्येपेक्षा जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के, तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उत्तराखंडमध्ये सर्वात कमी रिक्त पदे असून ९४ टक्के पोलीस कार्यरत आहेत. अनेकदा पोलीस कर्मचारी तपास सोडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात आणि बंदोबस्तांमध्ये गुंतून असतात. त्यामुळे राज्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.