रेल्वेत सुवर्णसंधी! – परीक्षा द्यायचीच नाही, सरळ नोकरीच ज्वॉईन करायची संधी!
Railway Bharti 2024
रेल्वेत सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने 1700 हून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 27 डिसेंबर 2024 आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या ठिकाणी अप्रेंटिसशिप करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. रिक्त पदांची माहिती आणि नोटिफिकेशनचा लिंक खाली दिला आहे.
पात्रता:
रेल्वे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेड/ब्रांचमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्रतेविषयी अधिक माहिती अधिकृत सूचनेतून मिळवता येईल.
वयोमर्यादा:
उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. वयाची गणना 1 जानेवारी 2024 च्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया:
या भरती प्रक्रियेत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित मेरिट लिस्ट तयार करून केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या सत्यापनासाठी बोलावले जाईल.
अर्ज शुल्क:
सामान्य आणि ओबीसी प्रवर्ग: 100 रुपये
एससी, एसटी आणि महिला उमेदवार: अर्ज शुल्कातून सूट
रेल्वेच्या या भरतीसंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी दक्षिण-पूर्व रेल्वे कोलकाताच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.