शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी क्रमांक-काय होणार फायदा ? सर्व शेतकरी आधार क्रमांकांशी जोडणार

Farmer ID Link with Aadhar


राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि पॅनकार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Farmer ID Link with Aadhar

 

राज्यात कृषी विभागाच्या शंभरहून अधिक योजना आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. योजनांच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात थेट जमा करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे बैंक खाते आधार कार्डशी संलग्न करावे लागते. जे शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेतात, त्यांची माहिती कृषी विभागाकडे आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा डेटा शासनाकडे नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या नावे असलेली एकूण जमीन, त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि आधार क्रमांकाच्या आधारे त्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अंमलबजावणीसाठी समित्या • हे काम महसूल विभागाकडे सोपविण्यात आले आहे. • याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले.

■ या समित्यांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.