भारतीय रेल्वेच्या विविध पदांसाठीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा दिनांक तपासा
Railway Exam Calendar 2024 PDF download
Railway Exam Calendar 2024 PDF download: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतात असंख्य उमेदवारांना भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड नियमितपणे भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी जाहिराती प्रकाशित करत असतो. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेले उमेदवार आरआरबीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करतात आणि त्यापैकी अनेकजण या प्रक्रियेत यशस्वी होतात, आपल्या रेल्वेत काम करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करतात. भारतीय रेल्वेमधील रिक्त पदे भरण्यासाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड सतत कार्यरत असतो. सध्या, काही आगामी भरती प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या वेळापत्रकाचा तपशीलवार अभ्यास करून अर्ज प्रक्रियेसाठी तयारी करावी.
Railway Recruitment Board Exam Schedule 2024
दरम्यान, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्याचे योजले आहे, त्या संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांची नियुक्ती अनेक निवडणुकीच्या टप्प्यातून होणार आहे. त्यात मुख्य परीक्षेत अर्ज करत्या उमेदवारांना उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच मुख्य परीक्षा पात्र करावी लागणार आहे. त्या परीक्षेत अपात्र ठरणाऱ्या उमेदवार नियुक्तीसाठीही अपात्र ठरतील. जूनियर इंजिनियर, सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियन तसेच उपनिरीक्षकाच्या पदासाठी जी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे त्याचे शेड्युल जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेच्या चार दिवसांमध्ये एक्झाम सिटी स्लिप तसेच प्रवेश पत्र जाहीर केले जाईल. तेव्हा उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र पाहता येणार आहे तसेच डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवार परीक्षेत उपस्थित राहण्यास अपात्र ठरेल. महत्वाची गोष्ट अशी की अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी आणि स्थिती बघण्याची विंडो परीक्षेच्या दहा दिवसां आधीच खुले केले जाईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने उमेदवारांना सल्ला दिला आहे की,’ या भरती प्रक्रिया विषयी तसेच परीक्षा विषयी जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. या प्रसंगी अनेक दलाल नोकरी देण्याच्या हेतूने उमेदवारांना फसवतील. तर त्यापासून उमेदवारांनी सावध राहावे.”
RRB Exam Date 2024
परीक्षा | तारखा | पद्धत |
---|---|---|
टेक्निशियन भरती परीक्षा | 18 – 20 डिसेंबर, 23, 24, 26, 28, 29 डिसेंबर | संगणक आधारित परीक्षा |
जूनियर भरती परीक्षा | 13, 16, 17 डिसेंबर | संगणक आधारित परीक्षा |
आरपीएफ सब इन्स्पेक्टर परीक्षा | 2, 3, 9, 12 डिसेंबर | संगणक आधारित परीक्षा |
या तक्त्यात परीक्षेचे नाव, नियोजित तारखा, आणि परीक्षा घेण्याची पद्धत दिलेली आहे. सर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) स्वरूपात घेतल्या जाणार आहेत.
RRB Number of vacancies for each post:
Post | Vacancies |
---|---|
Assistant Loco Pilot (ALP) | 18,799 |
Technician | 14,298 |
Constables and Sub-Inspectors (RPF) | 4,660 |
Paramedical Field | 1,376 |
RRB NTPC | 11,558 |