प्राध्यापकांच्या ७२ पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
Shivaji Vidyapeeth Pradhyapak Bharti 2024
Shivaji Vidyapeeth Pradhyapak Bharti 2024: शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७२ पदांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
प्राध्यापकांच्या ७२ पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा ६५९ पदांच्या भरतीला मान्यता दिली. शिवाजी विद्यापीठातील त्या अंतर्गत ७२ पदांच्या भरतीसाठी ‘ग्रीन सिग्नल मिळाला. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२, तर सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. या पदांचे अधिविभागनिहाय रोस्टर तयार करून तपासणी व त्यानंतर मान्यतेसाठीचा प्रस्ताव फेब्रुवारीत विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून, जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.