महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा

New Changes in MPSC Group B and C Exam Pattern

New Changes in MPSC Group B and C Exam Patternमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या सर्व बाबीचां विचार करून गट-‘ब’ (अराजपत्रित) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट ‘क’ सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. गट-‘ब’ व गट-‘क’ सेवांकरीता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहणार आहे. परंतु गट-‘ब’ व गट-‘क’ असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

New Exam Pattern For MPSC Group B and C Exam

गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.