पदवीधरांसाठी MPSC द्वारे लिपिक, सहायक पदांची मोठी जाहिरात प्रकाशित, त्वरित करा अर्ज!
MPSC Lipik Bharti 2024 Application Form
मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. MPSC ने विविध रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. एकूण 1333 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असून त्यानुसार पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल त्यांच्या वेबसाईटवर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे 1333 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक ,बेलिफ लिपीक, गट क नगरपाल मुंबई, लिपिक टंकलेखक या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीची पूर्ण महत्वाच्या लिंक आणि जाहिरात आम्ही खाली दिलेली आहे.
या भरतीसाठी 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीद्वारे उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय आणि लिपिक-टंकलेखक ही पदे भरली जाणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे.
शैक्षणिक पात्रता-
- कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य
- पदवी परीक्षेला बसलेले उमेदवार या संयुक्त पूर्व परीक्षेला तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण करणें आवश्यक आहे.
- संबंधित कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असलेल्या उमेदवाराने मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
- वयोमर्यादा – १९ ते ३८ वर्षे वयोमर्यादा आहे.
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 294 रुपये फी भरावी लागेल. महाराष्ट्र गट ब सेवा अराजपत्रित मधील पदांसाठी परीक्षा शुल्क देखील सारखंच असेल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे.