मुंबई महापालिकेत वार्ड निरीक्षक पदांची ९२००० पगाराची नोकरी, अर्ज सुरु!
BMC Bharti Ward Nirikshak
मित्रानो, सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही महानगरपालिकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. या भरती साठी पगार तब्ब्ल ९२ हजार आहे. पदवीधर उमेदवारांना हि एक सुवर्णसंधीच आहे. अर्ज आणि जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेलीच आहे. चला तर जाणून घेऊ पूर्ण माहित आणि अर्ज प्रक्रिया. (BMC Bharti Ward Nirikshak)
बृहन्मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड इन्स्पेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.वॉर्ड निरीक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्याचसोबत त्याने MS-CIT आणि टायपिंगचा कोर्स केलेला असावा. त्यामुळे ज्या तरुणांचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ९२,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत १७८ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.याबाबत सर्व माहिती mcgm.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (BMC Recruitment)
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.एकूण २०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. एमसीक्यू टाइप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (BMC Jobs)
Mag
समोरुन फोन यैनार का