सरकारची नवीन योजना, आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय!

NPS vatsalya yojana Marathi PDF


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची सुरुवात केली. योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (पीएफआरडीए) ही योजना राबवण्यात येत आहे. 

NPS vatsalya yojana Marathi PDF

काय आहेत योजनेच्या अटी? NPS vatsalya yojana Marathi PDF

■ १८ वर्षांपर्यंतची सर्व मुले वासाठी पात्र असतील. खाते फक्त मुलांच्या नावाने उघडले जाईल; परंतु त्यांचे पालक पैसे जमा करतील. मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील.

■ जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे उघडले येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म है-एनपीएसद्वारे देखील उघडू शकतात.

■ हे खाते कमीत कमी १००० रुपयांनी उघडता येईल. यात गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल.

■ तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल. • मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. मूल १८ वर्षाच होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.

 



Leave A Reply

Your email address will not be published.