आता 2 लाख सरकारी नोकऱ्या, 500 रुपयांत गॅस सिलेंडर, वृद्धांना 6 हजार पेन्शन!

New 2024 Yojana By Sarkar Election Scheme


काँग्रेसने हरियाणासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात महिला, तरुण आणि वृद्धांना डोळ्यासमोर ठेवून आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसने पहिल्या टप्प्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तर दुसऱ्या टप्प्याचा जाहीरनामा चंदीगडमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

New Yojana

कॉंग्रेसने कोणती आश्वासने दिली

1) हरियाणातील सर्व महिलांना (18-60 वयोगटातील) सरकार दरमहा 2,000 रुपये देणार.
2) महिलांना 500 रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार.
3) वृद्ध, अपंग आणि विधवांना 6,000 पेन्शन दिली जाणार.
4) सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस देणार.
5) युवांसाठी 2 लाख सरकारी नोकरीची भरती काढणार
6) काँग्रेस सरकार हरियाणाला ड्रग्जमुक्त करणार
7) राजस्थानच्या धर्तीवर काँग्रेस सरकार चिरंजीवी योजनेंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणार.
8) राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी 9- 300 युनिट मोफत वीज दिली जाणार.
10) 100-100 यार्डांचे मोफत भूखंड आणि पक्की घरे देण्याची योजना पुन्हा सुरू होणार.
11) काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देणार.
12) ओबीसींची क्रिमीलेयर मर्यादा 10 लाख रुपये करण्यात येणार आहे. तसेच सर्व जातींची लोकसंख्या शोधण्यासाठी जात सर्वेक्षण केले जाणार.



Leave A Reply

Your email address will not be published.