डिस्ट्रिक बँकेची ७०० पदांची जाहिरात प्रकाशित, आजपासून अर्ज सुरु, परंतु आचारसंहितेत अडकनार का भरती..
Ahmadnagar DCC Bank
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नोकर भरतीसाठी आजपासून अर्ज विक्री सुरू केली आहे. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल की आचारसंहितेत अडकेल, याबाबत साशंकता आहे. रायगड जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया निवडणुकीमुळे स्थगित केली आहे. ही भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. बँकेच्या संचालक मंडळाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. बेरोजगार तरुणांमध्ये भरतीबाबत मोठी उत्सुकता आहे. सन २०१७ साली बँकेने केलेली भरती वादग्रस्त ठरलेली आहे. ‘नायबर’ या खासगी कंपनीने त्या भरतीत अनेक नियम पायदळी तुडवले. अनेक संचालकांचे नातेवाईक व काही तालुक्यांतील सर्वाधिक उमेदवार त्या भरतीत निवडले गेले. या भरतीची लिंक येथे उपलब्ध आहे.
कंपनीचा अनुभव काय?
यावेळची भरतीही ‘वर्क वैल’ नावाच्या खासगी कंपनीकडून केली जाणार असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दोन आठवड्यापूर्वी सांगितले होते. बँकेने या कंपनीबाबत जाहीरपणे माहिती दिलेली नाही. तसेच भरतीत पारदर्शकता कशी राहील? या बाबीही स्पष्ट केलेल्या नाहीत. या कंपनीला किती अनुभव आहे? हा प्रश्न सहकार आयुक्तांना विचारला होता. मात्र, तपासणी करावी लागेल अशी प्रतिक्रिया सहकार आयुक्तांनी दिली होती.