लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान आजपासून सुरू!

Ladki Bahin Kutumb Bheti Abhiyan


शासनाच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबरपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाची सुरुवात करणार आहेत. सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी अभियानाची माहिती दिली.

Ladki Bahin Update copy

Ladki Bahin Kutumb Bheti Abhiyan या अभियानात शिवसैनिक दररोज बहीण योजनेचा ज्यांना लाभ झाला आहे, त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील, यासाठी एक अॅप तयार करण्यात आले असून, ते मंगळवारी लाँच होणार आहे. तत्पूर्वी राज्यभरातील शिंदेसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

 

-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थींशी भेट कार्यक्रम

-राज्यातील १ कोटी महिलांशी भेटून संवाद साधणार

-शिवसेनेचे ५० हजार कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार

-७० ते ८० विधानसभा मतदार संघांमध्ये लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान

-प्रत्येक मतदार संघात ६०० ते १००० कार्यकर्ते घरोघरी जाणार

-शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस अभियान चालणार

-दररोज प्रत्येक कार्यकर्ता किमान १० घरांना भेटी देणार

-दररोज किमान ५ लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य

-आठवड्यातील तीन दिवसांत १५ लाख घरांना भेटी देणार

-एका महिन्यात ६० लाख घरांना भेट देऊन लाडक्या बहिणीशी संवाद साधणार

-या अभियानातून १ कोटी महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

-या अभियानात कार्यकर्त्याच्या मोबाईलमध्ये विशेष ॲप समावेश असणार

-या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग, कार्यकर्त्याने केलेला संपर्क, वेळ समजणार

-गरज पडल्यास या ॲपमधून लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज भरला जाणार

-लाडकी बहिण योजनेबाबत महिलांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार



2 Comments
  1. Monika snehal mandavdhare says

    Approved msg ala pn paise nhi alet

  2. Shubhangi Mahendra Biramane. says

    Approval massage aala August madhe aala .pan paise aale nahit.

Leave A Reply

Your email address will not be published.