लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही,कसं जाणून घ्यायचं? जाणून घ्या 4 सोप्या ट्रिक्स !
Ladki Bahin status tracking
महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) खूप बोलबाला सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळत आहेत. आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? असा प्रश्न पडला आहे. याच आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, हे कसे तपासावे हे समजून घेऊ या.
आपल्याला माहितच असलं सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे.पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये दिले आहेत. सध्या या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात काही महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. आता लवकरच या योजनेसाठी वितरणाचा तिसरा टप्पा चालू होणार आहे.
तसेच या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळतील. तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळतील. म्हणजेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी बँकेचा अकाऊंट नंबर आधार नंबरला लिंक असणे बंधनकारक आहे.
खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.
1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.
Pese alenahit