Ladki Bahin Yojana,तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय, तरी 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

Ladki Bahin Yojana Rejections List


आपल्याला माहीतच असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता या महिलांना सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आहे. असे असतानाच अनेक महिलांचे (Women Application) अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट (Application Reject) झाल्यावर नेमकं करायचं काय? पुन्हा अर्ज करायचं की आणखी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

युनिफाइड पेन्शन योजना काय आहेत फायदे आणि तोटे जाणून घ्या!

तुम्ही अर्ज भरून झाल्यानंतर जसा तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो, तसाच मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला असेल तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका का रिजेक्ट झाला आहे. याचे कारण सांगितले जाईल.  जसे तुम्ही आधारकार्ड अपलोड केला नाहीत किंवा जन्म दाखला, रेशन कार्ड अपलोड केले नाहीत, तुमचा फोटो व्यवस्थित नाही आहे. तसेच तुम्ही पाठवलेली कागदपत्रे व्यवस्थित दिसत नाही, अशी अनेक कारणे तुम्हाला दिली जातात. या कारणानंतर तुम्हाला पुन्हा कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळे त्या पर्यायावरून पुन्हा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर होऊ शकतो.

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

 

 



2 Comments
  1. Shamal pralahad gadekar says

    आधार लिंक केला मी तरी पण पैसे आले नही

  2. Bharti Nilesh Lokhande says

    App madhe Edit Option naahi yet kay karave lagel maza Form Reject jhala aahe

Leave A Reply

Your email address will not be published.