MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय; आता पुढील तारीख कोणती?

MPSC NEW EXAM DATES 2024


मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल  गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या. त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे २५ ऑगस्टची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची होती. कारण यादिवशी MPSCजी  परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. आता आयोगाने याबद्दलचे नोटिफिकेशन काढून ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. हि उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. 

MPSC NEW EXAMDATES

MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी १० वाजता बैठक झाली. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आयोग म्हणाले, ‘आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.’

https://x.com/mpsc_office/status/1826513913434808777

 

आयबीपीएसची क्लर्कची परीक्षा २५ ऑगस्टला होणार आहे. त्याचे वेळापत्रत जानेवारी महिन्यातच आले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाने त्यांची २५ ऑगस्टची नियोजित परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा रेटा वाढल्याने तिथल्या आयोगाला राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.