आनंदाची बातमी !! जलसंपदा विभागात तब्बल 9 हजार नवीन नोकरी ची संधी !-9K+ Jobs in Maharashtra!

9K+ Jobs in Maharashtra!

महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. राज्याच्या जलसंपदा विभागाने तीन नामांकित कंपन्यांशी ९ करार केले असून, तब्बल ५७,७६० कोटींची गुंतवणूक आणि ९,२०० नव्या नोकऱ्या तयार होणार आहेत.

9K+ Jobs in Maharashtra!

या कंपन्यांमध्ये महाजेनको, एमआरईएल आणि आवादा यांचा समावेश आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे करार साकार झाले.

या करारांमुळे राज्यात सुमारे ८,९०५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे राज्याच्या ऊर्जाक्षेत्रात मोठी चालना मिळेल.

पुढे आणखी गुंतवणुकीची शक्यता वर्तवली जात असून, ही सुरुवातच असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकार उद्योगांसाठी वीज, रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधा स्वस्त दरात पुरवण्यासाठी तयारीत आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच…
याच गुंतवणुकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केलीय. अनेक उद्योग गुजरातकडे गेले, असा आरोप आदित्य ठाकरे व इतर नेत्यांनी वारंवार केलाय. तर सत्ताधाऱ्यांचा दावा — “महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढतोय!”

Leave A Reply

Your email address will not be published.