मोठी बातमी !! 92 हजार नोकऱ्यांची संधी! | 92,000 Job Opportunities Ahead!
92,000 Job Opportunities Ahead!
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक घटक प्रोत्साहन योजनेला अंतिम रूप दिले असून, येत्या 6 वर्षांत 23 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेमुळे सुमारे 92 हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विस्तार
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. डिस्प्ले मॉड्यूल, कॅमेरा मॉड्यूल, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली, लिथियम सेल एन्क्लोजर यासारख्या उत्पादनांवर विशेष भर दिला जाणार आहे.
उद्योग आणि नोकऱ्यांची वाढ
सरकार दरवर्षी 2300 ते 4200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या योजनेअंतर्गत सहभागी कंपन्यांना ठराविक वेळेत उत्पादन आणि नोकरीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे देशभर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल.
PLI नंतरची मोठी योजना
PLI योजनेनंतर ही दुसरी मोठी योजना असून, सरकार अॅपल आणि सॅमसंगसारख्या मोठ्या टेक कंपन्यांना देशांतर्गत मूल्यवर्धन 30-40% पर्यंत वाढवण्यासाठी पाठिंबा देणार आहे. यामुळे देशी उत्पादनाला चालना मिळेल.
तीन प्रकारचे प्रोत्साहन
या योजनेत तीन प्रकारचे प्रोत्साहन असणार आहे –
- ऑपरेशनल खर्चावर आधारित प्रोत्साहन
- भांडवली खर्चावर आधारित प्रोत्साहन
- दोन्हींच्या संयोगातून मिळणारे प्रोत्साहन
भविष्यातील सुवर्णसंधी
सरकारच्या या योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि भारतातील उत्पादन क्षमता वाढेल. इच्छुकांनी या संधीचा फायदा घ्यावा!