जाणून घ्या 8वा वेतन आयोग कोणासाठी ?-8th Pay Commission for All!
8th Pay Commission for All!
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेंशनधारकांना पगार व निवृत्तीवेतनात भरघोस वाढ मिळू शकते.
मात्र अलीकडे अशी माहिती समोर आली होती की 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेंशनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे बऱ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
यावर राज्यसभेत वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर देताना सांगितलं की, पेंशनधारकांनी काळजी करण्याची गरज नाही. फायनान्स बिलमध्ये झालेले बदल केवळ जुन्या नियमांना वैध ठरवण्यासाठी आहेत. यामुळे कोणत्याही निवृत्त कर्मचाऱ्याच्या लाभात कपात केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी असंही सांगितलं की 7व्या वेतन आयोगाच्या वेळी सगळ्या पेंशनधारकांना समान लाभ मिळाले होते, मग ते कधीही निवृत्त झालेले असोत. 8व्या वेतन आयोगातही हाच न्याय दिला जाईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.