खुशखबर! मुंबई महापालिकेत 690 जागांची भरती, 1 लाख 40 हजारांपर्यंत पगाराची संधी

690 posts Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो, सध्या मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून 690 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची ज्यांना इच्छा असल्यास मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत. इंजिनियर उमेदवारांसाठी हि आनंदाची बातमी आहे. 

BMC Bharti 2024 Engineering

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 250 जागांपैकी 24 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 37 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 8, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 4 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 4, ओबीसी 35, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 25, ईडब्ल्यूएससाठी 22 आणि खुल्या प्रवर्गासाठी 84 जागा आहेत.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 130 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 10 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 1, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 2 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 2, ओबीसी 20, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 13, ईडब्ल्यूएससाठी 18 आणि खुल्या प्रवर्गासाठी 44 जागा आहेत.

दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 233 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 233 जागांपैकी 22 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 14 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 4, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 8, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 6 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 7, ओबीसी 47, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 23, ईडब्ल्यूएससाठी 23 आणि खुल्या प्रवर्गासाठी 77 जागा आहेत.

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 77 जागांपैकी 16 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 4 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 2, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 1, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 1 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसी 10, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 18, ईडब्ल्यूएससाठी 8 आणि खुल्या प्रवर्गासाठी 25 जागा आहेत.

मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 11 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. याभरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात उमेदवारांना 11 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरती प्रक्रियेसंर्भातील अधिक माहिती देखील 11 नोव्हेंबरला उपलब्ध होईल.

मुंबई महापालिकेनं सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी,पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

1 Comment
  1. Nurunissa Kalu shaikh says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.