आदिवासी विकास विभागात भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरतीची जाहिरात आता… !

67% Posts Vacant in Tribal Development Department!

आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक विभागात ६७ टक्के पदे रिक्त असल्याने फक्त ३३ टक्के अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण कामकाज सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जबाबदारी आली आहे.

67% Posts Vacant in Tribal Development Department!

महामंडळाचे उद्दिष्ट
महामंडळ आदिवासी शेतकरी, कारागीर आणि भूमिहीन मजुरांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवते. त्यामध्ये आर्थिक मदत, शेती आणि जंगलातील उत्पन्न विक्रीसाठी उपाययोजना केल्या जातात. नाशिक विभागांतर्गत प्रादेशिक कार्यालय व पाच उपप्रादेशिक कार्यालये आहेत. त्यात १३५ पदे मंजूर असली तरी फक्त ४५ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

विपणन निरीक्षकांची कमतरता
सुरगाणा उपप्रादेशिक कार्यालयात ८ विपणन निरीक्षकांची पदे मंजूर असली तरी फक्त एकच पद भरलेले आहे, उर्वरित ७ पदे रिक्त आहेत. पेठ कार्यालयात ७ निरीक्षक पदे मंजूर असून सर्वच पदे रिक्त आहेत. तसेच, लेखापालांची २ पदे मंजूर पण दोन्ही रिक्त आहेत.

प्रादेशिक व्यवस्थापकपदही रिक्त
नाशिक विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक पदासह प्रशासकीय, विपणन व लेखा व्यवस्थापक पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अधिकारी नेमके कोणती जबाबदारी सांभाळावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.