महत्वाचा अपडेट – शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी हजर!

50K+ students took the scholarship exam!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात तब्बल ५०,२६८ विद्यार्थी उपस्थित होते, तर १,३५८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. जिल्ह्यात ३७९ परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांत ही परीक्षा पार पडली.

50K+ students took the scholarship exam!

दरवर्षी परीक्षा परिषदेतर्फे पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक आणि आठवीसाठी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी रविवारी (दि. ९) राज्यभर ही परीक्षा घेण्यात आली.

राज्यातील ३७९ परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी २ ते ३.३० अशा दोन सत्रांत परीक्षा पार पडली. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता अशा चार विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले.

विद्यार्थ्यांची उपस्थिती:

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा: २९,१५२ विद्यार्थी हजर, तर ७१२ विद्यार्थी अनुपस्थित
आठवी शिष्यवृत्ती परीक्षा: २१,११६ विद्यार्थी हजर, तर ६४६ विद्यार्थी अनुपस्थित

परीक्षा सुरळीत पार पडावी आणि गैरप्रकार टाळता यावा म्हणून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.