लाडकी बहीण योजना ,५० हजार महिलांचा लाभ बंद; चारचाकीधारकांना फटका !

50 thousand Women Disqualified Four-Wheeler Owners Affected !

सोलापूर जिल्ह्यात ११ लाख ९ हजार ४८७ महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत, त्यांची दोन याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या आहेत.

50 thousand Women Disqualified Four-Wheeler Owners Affected !

यानुसार, सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू असून, आतापर्यंत ५० हजार महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो, तसेच लाभार्थी महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी. कुटुंबाकडे पाच एकरांपेक्षा जास्त जमीन नसावी, असेही महत्त्वाचे निकष आहेत.

संजय गांधी निराधार योजना व पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आधीच राज्यस्तरावरून वगळण्यात आले आहे. आता चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरू असून, फेब्रुवारी महिन्याचा लाभ नेमका कधी मिळेल, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.