खुशखबर, वृद्ध नागरिकांना पाच लाखांचे विमा कव्हरेज!
5 lakh Insurance for Senior Citizens
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (एबी पीएम-जेएवाय) अंतर्गत ७० वर्षांपेक्षा अधिक व्याच्या सर्व वरिष्ठ नागरिकांना 9 लाख रुपयांचे विमा कव्हरेज देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. साडेचार कोटी कुटुंबांतील नागिरकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा पात्र नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी त्यांना एक नवीन व वेगळे कार्ड मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
एबी पीएम-जेएवाय’या योजनेत आधीच समावेश असलेल्या कुटुंबातील ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी प्रत्येक वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त ‘टॉप-अप कव्हर’ दिले जाणार आहे. ७० वर्षाच्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिक कर्मचारी राज्य विमान योजनेअंतर्गत येत असतील किंवा त्यांची खासगी विमा पॉलिसी असली तरी या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने ३१ हजार ३५० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांच्या विकासाला मदत करण्यासाठी १२,४६१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील ८ वर्षांत है प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक बस, रुग्णवाहिका आणि ट्रक यांसारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण १४,३३५ कोटी रुपये खर्चाच्या दोन मोठ्या योजनांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासोबतच अनेक विकास कामांसाठीच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.