नोकरीची संधी !! कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये ४९० पदांची भरती सुरु !-490 Job Vacancies Alert!

490 Job Vacancies Alert!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं ४९० पदांसाठी नोकरभरतीची ग्वाही दिली आहे. २०२१ ला मंजूर झालेल्या आकृतीबंधाप्रमाणे ही भरती होणार. एकूण ६४० पदं मंजूर झाली होती, पण यंदा ४९० पदं भरायचा निर्णय घेतला गेलेला आहे.

490 Job Vacancies Alert!ही भरती अग्निशमन, वैद्यकीय, उद्यान, यांत्रिक, लेखा आणि सामान्य प्रशासन विभागांमध्ये होणार. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जातील.

१० जूनपासून अर्ज सुरू झालेत, आणि शेवटची तारीख आहे ३ जुलै. परीक्षेपूर्वी ७ दिवस आधी हॉलटिकिट मिळणार. परीक्षा कधी होईल ते वेबसाइटवर अपडेट होईल.

११६ लिपिक, १३८ फायरमन, ५८ कनिष्ठ अभियंता, ७८ नर्स, १६ लेखा लिपिक, १४ औषध निर्माता अशा पदांची नोंद आहे. एकूण २१ विभागांमध्ये भरती होणार.

ही संपूर्ण भरती आणि परीक्षा टीसीएस कंपनीकडून होईल. काही अडचण आली तर त्यांनी दिलेल्या हेल्पलाइनवर कॉल करा.

पालिकेनं स्पष्ट केलंय – ऑनलाईन भरती आहे, कुणाच्या आमिषाला बळी पडू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.