आनंदाची बातमी !! शाळेतील मुलींना मिळणार दरवर्षी ४,००० रुपये मदत ! जाणून घ्या सविस्तर माहिती
4,000 Yearly Aid for Vidarbha Girls!
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरवर्षी ₹४,००० ची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ही विशेष तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
मनपा शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकतात. त्यामुळे १ ली ते १२ वीच्या वर्गातील, तसेच ८०% हजेरी असलेल्या मुलींना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी २.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी इतर सुविधा:
- समुपदेशन केंद्र: विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व नैराश्य टाळण्यासाठी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन दिलं जाणार. यासाठी ₹१ कोटींची तरतूद केली आहे.
- बालवाडी सुरू होणार: नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ३ वर्षांपासून शिक्षणाची सुरुवात केली जाणार असून, जिथे २० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तिथे प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती होईल. यासाठी ₹५५ लाख खर्च केला जाणार आहे.
- स्पर्धा परीक्षांसाठी ‘सुपर ७५’ योजना: अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, एनडीए अशा परीक्षांसाठी ८ वीतील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून मोफत मार्गदर्शन व शिकवणी दिली जाणार.
विदर्भातील विद्यार्थिनींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे!