अमली पदार्थ तस्करी विरोधात ३४६ नवीन कृतीदल पदांची निर्मिती!!

346 New Posts Sanctioned for Anti-Narcotics Task Force!!

राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कृतीदल स्थापन करण्याच्या निर्णयाला अखेर मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवारी एकूण ३४६ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात स्वतंत्र अमली पदार्थविरोधी कृतीदल कार्यरत होणार आहे.

346 New Posts Sanctioned for Anti-Narcotics Task Force!!

राज्यात सध्या सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर आता अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी विशेष टास्क फोर्स उभारण्याचा निर्णय ३१ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आला होता. दीड वर्षानंतर अखेर या दलासाठी पदनिर्मिती आणि खर्चास मान्यता देण्यात आली आहे. ३१० पदे नियमित स्वरूपाची असतील, तर ३६ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.

नवीन पदनिर्मिती व खर्चाचे विवरण
या दलाच्या स्थापनेसाठी १९ कोटी २४ लाख १८ हजार ३८० रुपये वार्षिक खर्च मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय ३ कोटी १२ लाख ९८ हजार रुपये वाहन खरेदी आणि इतर अनावर्ती खर्चासाठी देण्यात येणार आहेत.

नियमित पदांची तपशीलवार माहिती
विशेष पोलीस महानिरीक्षक – १
पोलीस उपमहानिरीक्षक – १
पोलीस अधीक्षक – ३
अप्पर पोलीस अधीक्षक – ३
पोलीस निरीक्षक – १५
सहाय्यक पोलीस निरीक्षक – १५
पोलीस उपनिरीक्षक – २०
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – ३५
पोलीस हवालदार – ४८
पोलीस शिपाई – ८३
चालक पोलीस हवालदार – १८
चालक पोलीस शिपाई – ३२
बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदे
वैज्ञानिक सहाय्यक – ३
विधी अधिकारी – ३
कार्यालयीन शिपाई – १८
सफाई कामगार – १२
एकूण – ३६ पदे
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर कठोर नियंत्रण ठेवता येणार असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.