DRDO इंटर्नशिप 2025!-DRDO Internship 2025!

DRDO Internship 2025!

पुण्याच्या RDE (E) म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनिअर्स), जी DRDOच्या अंतर्गत येते, इथं 2025 साठी विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिप सुरू झाली आहे. ही संधी अगदी खास हाय – डिफेन्स टेक्नॉलॉजीवर प्रत्यक्ष काम करण्याची आणि उच्च दर्जाच्या प्रयोगशाळेत अनुभव घेण्याची.

DRDO Internship 2025!कोणकोणत्या शाखांना संधी?
या इंटर्नशिपमध्ये 40 जागा उपलब्ध आहेत. मेकॅनिकल, पॉलिमर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, AI & डेटा सायन्स – अशा अनेक शाखांमधल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार.

पात्र कोण?
बी.टेकच्या शेवटच्या वर्षात (7वी/8वी सेम) असलेले आणि एम.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पण त्यासाठी 75% मार्क्स किंवा CGPA 7.5 आवश्यक हाय. तसेच, कॉलेजकडून शिफारसपत्र (recommendation letter) लागणारच.

निवड कशावरून होणार?
फक्त आणि फक्त गुणवत्तेवर. अभ्यासातील कामगिरी, इतर स्पर्धा किंवा अचिव्हमेंट्स – सगळं बघितलं जाईल. 300 शब्दांचं छोटंसं बायोडेटा देणं आवश्यक आहे. सिलेक्ट झालेल्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येणार.

अर्ज कसा करायचा?
DRDOच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा, भरून स्कॅन डॉक्युमेंटसह खालील ईमेलवर पाठवायचा:
[email protected] आणि [email protected]

ईमेल सब्जेक्ट: R&DE(E) PUNE – APPLICATION FOR PAID INTERNSHIP SCHEME 2025 (BRANCH CODE NO: ___)

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2025

  • निवड झालेल्यांना ईमेल – 25 जुलै 2025

  • इंटर्नशिप सुरू – 1 ऑगस्ट 2025

Leave A Reply

Your email address will not be published.