आनंदाची बातमी !! आरोग्य विभागात ३०८ पदांची भरती सुरु ! चला तर मग अर्ज करा
308 Vacant Posts in Health Dept!
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या असंख्य पदे रिक्त असून, त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये क्लासवन डॉक्टरांची ४६ पदे मंजूर असली तरी २२ पदे रिक्त आहेत.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, रिक्त पदांमुळे या रुग्णालयांतील सेवा अडथळ्यात येत आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून, या भेटीत रिक्त पदांचा प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १४२८ मंजूर पदांपैकी ३०८ पदे रिक्त आहेत. यापैकी फक्त जिल्हा रुग्णालयातच १४७ पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विशेषतः, जिल्हा रुग्णालयात १२ क्लासवन डॉक्टरांची पदे रिक्त असून, अचलपूर महिला व बाल रुग्णालयासह इतर ग्रामीण रुग्णालयांमध्येही डॉक्टरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे भरली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.