नाशिक विभागात पदविका अभ्यासक्रमाच्या तब्बल २५ हजार जागा रिक्त ! जाणून घ्या माहिती

25 Thousand Diploma Seats in Nashik!

दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही पुढील शिक्षणाच्या मार्गदर्शनाचं वेध लागलाय. अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी नाशिक विभागात तब्बल २५ हजार जागा उपलब्ध आहेत. यापैकी फक्त नाशिक जिल्ह्यातच ९ हजार जागा आहेत.

25 Thousand Diploma Seats in Nashik!

सध्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी तंत्रनिकेतनकडून पूर्ण तयारी ठेवली गेलीय. दहावीनंतर करिअरच्या विविध वाटा उघड्या असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकडे असतो. पण अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष नेहमीच पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाकडे असतं.

तंत्रनिकेतनची सज्जता; प्रवेश प्रक्रिया लवकरच!
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं नियोजन होतं. सध्याच्या घडीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा झालेली नाही. पण दहावीचा निकाल लागल्यामुळे लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवावी, असं आवाहन करण्यात आलंय.

तंत्रनिकेतनमध्येदेखील विद्यार्थ्यांना उपलब्ध अभ्यासक्रमांची आणि संधींची माहिती दिली जात आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं जातंय.

आयटीआय प्रवेश प्रक्रियाही लवकरच सुरू होणार!
दहावीनंतर कौशल्याधारित शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आयटीआय हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. मागील काही वर्षांत आयटीआयला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. पण ही प्रक्रिया देखील काही दिवसांतच सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.