पिक विम्याचे तब्बल 2308 कोटी रुपये लवकरच खात्यात!-2308 Crore Crop Insurance Payout Soon!

2308 Crore Crop Insurance Payout Soon!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 2308 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला हप्ता दिल्यामुळे आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

2308 Crore Crop Insurance Payout Soon!

कधी मिळणार पैसे?
खरीप हंगाम 2024 साठी मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. याआधी राज्य सरकारने आपला हिस्सा दिला नसल्याने भरपाई रखडली होती. मात्र आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई?
या भरपाईतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग याअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे ३ लाख शेतकऱ्यांना १४५५ कोटी रुपये, प्रतिकूल हवामानामुळे १८.८४ लाख शेतकऱ्यांना ७०६ कोटी, तर काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून १.४८ लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपये मिळणार आहेत.

रब्बी हंगामासाठी काय?
सध्या रब्बी हंगाम 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसानीच्या नोंदी आलेल्या नाहीत. त्यामुळे खरीप हंगामाइतकी मोठी भरपाई मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय असून लवकरच त्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.