डोंबिवली महानगरपालिकेत २०६८ सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी !-2068 Employees Gain Assured Progress!

2068 Employees Gain Assured Progress!

डोंबिवली महानगरपालिकेतील १० ते ३० वर्ष सेवेत असलेल्या २०६८ सफाई कामगारांना अखेर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

2068 Employees Gain Assured Progress!

यापूर्वी, लिपिक संवर्गातील २५० हून अधिक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, अनेक सफाई कामगारांना तांत्रिक अडचणींमुळे पदोन्नती मिळू शकली नाही. या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे व अन्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणांवर अंतिम निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित कामगारांना वेतनवाढ, निवृत्तीवेतन व इतर फायदे मिळतील.

पालिका प्रशासनाने लवकरच पात्र कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करणार असून, यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. तसेच ३६३६ प्रकरणे अजूनही प्रलंबित असून, ती मार्गी लावण्यासाठी कर्मचारी संघटना प्रयत्नशील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.