लाडकी योजनेत १९ लाखांचा घोटाळा!-19 Lakh Scam in Ladki Scheme!

19 Lakh Scam in Ladki Scheme!

मुंबईहून धक्कादायक खुलासा! ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली १९ लाखांची मोठी फसवणूक झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केलंय.

19 Lakh Scam in Ladki Scheme!

योजनेच्या नावानं तब्बल १०४ बनावट बँक खाती उघडून सरकारी निधीचा गैरवापर झालाय. आरोपींनी गरिब नागरिकांची खाती फक्त एक हजार रुपयांत खरेदी करून ही फसवणूक रचली.

या प्रकरणात मुंबईसह सातारा, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. जूहू पोलिसांच्या तपासात ही संपूर्ण माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सध्या ही संपूर्ण रक्कम गोठवण्यात आली असून प्रतीक पटेल नावाचा मुख्य आरोपी फरार आहे. नागरिकांच्या विश्वासावर झालेला हा घाला सध्या जोरात चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.