आदिवासी विकास विभागात 1,497 पदांची भरती प्रक्रिया आता सुरु होणार!
1,497 Posts Recruitment in Tribal Development Department !
मित्रांनो, एक महत्वाची बातमी, आताच प्राप्त माहिती नुसार महराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असून, त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. गरजेनुसार ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने 1,497 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. निश्चितच हि बातमी आपल्या साठी महत्वाची असून आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका. चला तर पूर्ण माहिती आणि किती पदांची हि भरती सरणार आहे ते बघूया..
भरतीचा तपशील:
आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या निर्णयानुसार, शासकीय आश्रमशाळांमधील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक ही पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. यासाठी GEM पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पदसंख्या आणि विभागवार माहिती:
- कला शिक्षक – 499 पदे
- क्रीडा शिक्षक – 499 पदे
- संगणक शिक्षक – 499 पदे
- एकूण – 1,497 पदे
भरती प्रक्रियेचे मुख्य मुद्दे:
- बाह्य स्रोताद्वारे पदभरती करण्यासाठी 8१ कोटी 8 लाख 75 हजार रुपये इतक्या अंदाजित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- निविदा प्रक्रिया व्यापक प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदा पूर्व बैठक आयोजित करून निवेदकांच्या अडचणी दूर केल्या जातील.
प्रक्रियेचा पुढील टप्पा:
राज्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालये शासकीय आश्रमशाळांवर नियंत्रण ठेवतात. या कार्यालयांच्या माध्यमातूनच भरतीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाने 2 जानेवारी 2025 रोजी या पदभरतीचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा!